HW News Marathi
महाराष्ट्र

विश्वास नांगरे पाटलांना माहिती लपवून ठेवली म्हणून निलंबित करा! – प्रकाश आंबेडकर

मुंबई। विश्वास नांगरे पाटलांनी माहिती लपवून ठेवली म्हणून त्यांना निलंबित करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकरांनी काल (१३ एप्रिल) अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, पवारांच्या घरावर अनुचित प्रकार घडणार असल्याची माहितीचे पत्र गुप्तचर यंत्रणांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चार दिवस आधी दिले होते. मग, नांगरे पाटील यांनी यावर कारवाई करणे अपेक्षित होते, तरी देखील त्यांनी ते केले नाही. यामुळे पवारांच्या घरावर हल्ला झाला, असा आरोप त्यांनी असून त्यामुळे माहिती लपवून ठेवली म्हणून त्यांना निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे उपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यांना ४ एप्रिल रोजी पत्र पाठविले होते. या पत्रात शरद पवार यांचे सिल्वर ओकओक निवासस्थान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘मातोश्री’ आणि ‘वर्षा’, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान, आणि मंत्रालय याठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 

Related posts

रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना मंत्री आदित्य ठाकरेंची भेट

Aprna

भोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार! – दिलीप वळसे पाटील

Aprna

राज्याचे मुख्यमंत्री लवकरच बदलणार

News Desk