HW News Marathi
महाराष्ट्र

“खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार?,” दरेकरांचा सवाल

कल्याण | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज (११ जुलै) कल्याण डोंबिवली शहराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला. कल्याण डोंबिवली शहराच्या विकासावर बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचेच खासदार, पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते लोकांची सेवा कधी करणार? असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला आहे

काय म्हणाले प्रविण दरेकर?

“कल्याण डोंबिवलीत सत्ता शिवसेनेची आहे. शहराचा खासदार, शिवसेनेचा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरीही आता जर विकास झाला नाही तर लोकांनी भरभरून मते दिली आहेत. त्यांची सेवा कधी करणार? विकासासाठी भाजपाचे सहकार्य कायम आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

‘रेल्वे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांना भेटणार’

“सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु व्हाव्यात यासाठी रेल्वे आंदोलन करावे लागले तर आंदोलन करु”, असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. “हातावर पोट भरणारा कर्मचारी वर्ग कर्जत-कसारा ठाण्यापर्यंत राहतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊ”, असंदेखील ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी

News Desk

देख लिया “७० साल मे कुछ नही हुआ.. देख लिया… !

News Desk

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

News Desk