HW News Marathi
महाराष्ट्र

मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? दरेकरांचा पवारांना सवाल

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१९ जुलै) राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन केलेल्या वक्तव्यांने राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. विरोधक पक्षाकडून त्यांच्या या वक्तव्यांने टीका सुरुच आहेत. अशातच भाजपाचे विधानसभेवर विरोधक पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी, मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? असा सवाल केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाण्यासाठी पवारांच्या एनओसीची गरज लागणार नाही, असा टोलाही दरेकरांनी शरद पवारांना लगावला आहे.

शरद पवारांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना प्रत्तुत्तर दिले आहे. ‘शरद पवारांनी राम मंदिराबद्दल जे काही वक्तव्य केले आहे, ते मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी केले तर नाही ना? हे पाहावे लागेल’, असे दरेकर म्हणाले. तसेच,राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, अजून उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे, असे म्हणत दरेकरांनी पवारांना टोला लगावला आहे.

‘शिवसेना पूर्वी आम्हाला म्हणत होती की, ‘मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नही बताएगें’ पण आता तर तारीख सांगितली आहे तेव्हा ते जातील अशी अपेक्षा आहे’, असे म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना आपल्या विधानाची आठवण करून दिली आहे. त्यामूळे राम मंदिराचा हा भूमिपूजनाचा वाद राजकारणात धुमाकूळ घालत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगडमध्ये संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसे सापडले; राज्यभरात ‘हाय अलर्ट’

Aprna

पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीला अजित पवारांची दांडी, चर्चांना उधाण

News Desk

संपावर तोडगा म्हणून एसटी डेपो जवळून खाजगी वाहनाना सेवा देण्यास परवानगी

News Desk