नवी दिल्ली | कोरोनाचा पादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ एप्रिल) देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि विरोधकांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार असून या बैठकीत भाजप, काँग्रेस, डीएमके, एआयएडीएमके, टीआरएस, सीपीआयएम, टीएमसी, शिवसेना, राष्ट्रवादी, अकाली दल, एलजेपी, जेडीयू, एसपी, बीएसपी, वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी या पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
Delhi: Prime Minister Narendra Modi held a meeting with floor leaders of parties whose combined strength in Lok Sabha and Rajya Sabha adds up to 5 MPs, via video conferencing today, on #COVID19 situation in the country. pic.twitter.com/62LkzLGhYE
— ANI (@ANI) April 8, 2020
दरम्यान, या बैठकीत तृणमूल काँग्रेसकडून टी आर बालू, एआयएडीएमकेच्या वतीनं नवनीत कृष्णन, काँग्रेसकडून गुलाब नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी, टीआरएसकडून नम्मा नागेश्वर राव आणि के केशवा राव, सीपीआयएमकडून ई करीम, शिवसेनेकडून विनय राऊत आणि संजय राऊत तसंच राष्ट्रवादीकडून शरद पवार पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे, खासदार निधी स्थगित करणे तसंच मेडिकल साधनांसाठी राज्य सरकारला त्वरीत आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, यांसारख्या विषयांवर चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.