मुंबई | पंढरपूरची यात्रा ही सर्वात प्राचीन यात्रा आहे. तर या यात्रेकडे एक चळवळ म्हणून देखील पाहिलं जातं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ नोव्हेंबर) पालखी मार्गांचे भूमिपूजन वेळी म्हणालं. शेकडो वर्षांच्या गुलामीत देश होता, देशावर अनेक हल्ले झाले, देशावर वेगवेगळी संकटी आली. पंरतु, भगवान विठ्ठलवरची आपली आस्था आणि वारी सुरूच राहिली. पंढरपुरची यात्रा ही सर्वात प्राचीन यात्रा आहे. तर या यात्रेकडे एक चळवळ म्हणून देखील पाहिलं जातं, असंही यावेळी म्हणाले.
तसेच दिंडीत कोणताही भेदभाव नसतो. हे सर्व वारकरी एकमेंकाचे बहिण-भाऊ असतात. आणि ही सर्व विठ्ठलाची मुले असल्याचे ही ते म्हटले. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं मोदींनी म्हणालं. मोदींनी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीतून भाषणाला सुरुवता केली. पंढरपूरला जोडणाऱ्या हा मार्ग २२५ किलोमीटर लांबीचा असणार आहे.
Prime Minister Narendra Modi lays foundation stone of four laning of key sections of Sant Dnyaneshawar Maharaj Palkhi Marg and Sant Tukaram Maharaj Palkhi Marg. pic.twitter.com/xWFzZin8dw
— ANI (@ANI) November 8, 2021
या भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.