HW News Marathi
Covid-19

देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे !

मुंबई | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२ मे) देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २० लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचा काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी ठिका केली. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या आर्थिक पॅकेज स्वागत केले. तसेच अर्थव्यवस्सथेची घडी बसवण्यासाठी सरकारने देशातील विविध देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असेलेले सोने ताब्यात घ्यावे, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण ट्वीटमध्ये म्हणाले, “सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे. यामुळे संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा चीनला स्पष्ट इशारा

News Desk

केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत !

News Desk

देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू

News Desk