HW News Marathi
महाराष्ट्र

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले यांना 10 दिवसांची CBI कोठडी

मुंबई | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना येस बँक आणि डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणीने सीबीयाने न्यायालयाने १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. अविनाश भोसले यांना सीबीआयने २६ मे रोजी पुण्यातून अटक केले होते. यानंतर भोसलेंना २७ मे रोजी सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. भोसलेंना सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये तीन दिवस नजर कैदेमध्ये ठेवले होते. यानंतर न्यायाधीसांनी दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  भोसलेंवर निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने आज (३१ मे) भोसलेंना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये तीन हजार सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात दिले होते. यात राणांना ६०० कोटी रुपयांचा मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून डीएचएफएलने भोसलेंशी संबंधित कंपनीचे पैसे वळले होते. तसेच बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपमध्ये  पैसे गुंतवल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते. भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर २६ सप्टेंबरला सुनावणी

News Desk

तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती, भाजपची टीका

News Desk

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

Aprna