HW News Marathi
महाराष्ट्र

एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून पैसे , पुणे पोलिसांची माहिती

पुणे | माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांकडून एल्गार परिषदेतील काही जणांच्या घराची झडती घेण्यात आली. पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी मुंबई, दिल्ली, छत्तीसगढ, हैद्राबाद, हरियाणा, रांची येथे छापे घालून कारवाई केली. तसेच याच ठिकाणी माओवाद्यांचे थिंक टॅंक असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या

भीमा-कोरेगाव हिंसाचार, तपासाची दिशा बदली – प्रकाश आंबेडकर

भीमा-कोरेगाव परिसरात काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार !

News Desk

सांगलीत भाजपला शिवसेनेचा धक्का!

News Desk

“गारपीठीने शेतकरी आडवा झालाय…”; पंचनामे न करण्यावरून अजित पवार आक्रमक

Chetan Kirdat