पुणे | बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मराठे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने मराठे यांना पोलिसांनी अटक केले होते.
डिएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे आणि इतर कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मराठे यांना भारता बाहेर न जाणे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच ठेवीदारांची फसवणूक आणि कुलकर्णी यांना देण्यात आलेले कर्ज या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी जामीनासाठी केला होता.
पुणे पोलिसांनी रिझर्व्ह बँकेची परवानगी न घेता रवींद्र मराठे यांना अटक केल्यामुळे पोलिसांवर सर्व स्तरातून टीका झाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठे यांच्या अटकेबाबत नाराजी व्यक्त केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.