HW News Marathi
महाराष्ट्र

आज धनगर समाजाचे पुण्यात आंदोलन

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनांमुळे वातावरण तापलेले आहे. परंतु आता मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजानेही आजपासून महाराष्ट्रात आंदोनाचा इशारा दिला आहे. धनगर समाजाने आपला समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी केली आहे.

मराठा आंदोलनामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्या गेल्या आठवडाभरापासून राज्यात फिरणे देखील कठीण झाले आहे. त्यातच आता धनगर समाजाने देखील आंदोलनाचा इशार दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आज पुणे येथे दुधाने लॉनवर राज्यभरातील धनगर समाज एकत्र येणार आहे. धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करा या मागणीसाठी सध्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

धनगर आणि धनगड अशा दोन जाती असल्याचा सरकार ने दावा केला आहे. तसे प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिले. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चुक आहे राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे येत्या १ सप्टेंबर पुर्वी ही चुक दुरुस्त केली नाही तर ५ लाख धनगर मिळून औरंगाबाद येथे एल्गार पुकारणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Independence Day | देशभरात ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

swarit

#Coronavirus : पुण्यात आज ८० नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जण कोरोनामुक्त

News Desk

सातारा हद्दवाढीचा ५० वर्ष जुना विषय अखेर सुटला, शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश!

News Desk