नवी दिल्ली | दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे दिल्लीत कृषी कायद्या विरोधात आंदोलन कायम आहे. कित्येक दिवसांपासून शेतकरी ठिय्या मांडून बसले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १४ भाजपा विरोधी पक्षाचे नेते जंतरमंतरवर पोहोचले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, डीएमके, आरजेडीसह डाव्या पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र आम आदमी पार्टी, टीएमसी आणि बीएसपी उपस्थित नव्हते.
Today all opposition parties have gathered here (Jantar Mantar) to extend their support against 'Kala Kanoon' (farm laws)… We want a discussion over Pegasus, but they (Centre) are not letting it happen. Narendra Modi has intercepted every Indian's phone: Rahul Gandhi, Congress pic.twitter.com/9kxrShhKIS
— ANI (@ANI) August 6, 2021
सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील
राहुल गांधींनी सध्या शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले आहेत. “आम्ही आज शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत. सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील. त्यानंतरच हे आंदोलन संपेल.”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. तसेच प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये मोदी घुसले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. संसदेत कृषी कायदे आणि पेगॅससच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरुच आहे. विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेचं कामकाज ठप्प आहे. १९ जुलैला संसदेचं कामकाज सुरु झालं होतं. मात्र तेव्हापासून आतापर्यंत कामकाज ठप्प आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.