HW News Marathi
महाराष्ट्र

राजपूतांनाही आरक्षण द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई | राज्यात मराठा समाजापाठोपाठ इतर समाजही आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. धनगर समाजानेही आंदोलन केले होते. दरम्यान, या सर्व समाजांची रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला जात आहे. यामध्ये मराठा, धनगर समाज प्रामुख्याने आरक्षण मागणी करत आहे, तर ओबीसी समाजाकडून आरक्षण बाधित राहावे किंबहुना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली जात आहे.

अशी परिस्थिती असताना आता राजपूत समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. राजपुतांना सरसकट आरक्षण द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर १९ ऑक्टोबरला मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे. राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी हा इशारा दिला आहे. राजपूत समाजातर्फे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान १९ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येईल असे सेंगर यांनी जाहीर केले. मराठ्यांना आरक्षण दयावे किंवा आरक्षण सिस्टीम रद्द करावी या खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीचे सेंगर यांनी समर्थन केले.

तसेच देशासाठी इतिहासामध्ये मराठा आणि राजपूत यांनी प्राणाचे बलिदान दिले. या देशाला गुलामीतुन सोडविले. त्यामुळे मराठांसोबत राजपूतांनासुद्धा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. किवा प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मास वेगळे वेगळे कायदे असणारे विषमता प्रधान करणारे सविंधानच बदला असे देखील सेंगर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या पाया पडू नका आरक्षण द्या नाहीतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, विनायक मेटेंची मागणी

News Desk

फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

News Desk

३०० कोटींचा मालक ५-६ कोटींसाठी आत्महत्या करतो? हे पटण्यासारंखं नाही – निलेश राणे

News Desk