मुंबई | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (५ जानेवारी) ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जावून सदिच्छा भेट घेतली. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. या दोघांच्या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. अशोक गेहलोत जी यांनी आज मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
The Hon’ble CM of Rajasthan @ashokgehlot51 ji met with the Hon’ble CM of Maharashtra at his residence in Mumbai today. pic.twitter.com/n0vnwxpQiG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 6, 2020
गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाविसआघाडी या नव्या राजकीय समीकरणाचे कौतुक केले आहे. मात्र, स्वत: उद्धव ठाकरे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. अशोक गेहलोद हे मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार ही भेट झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे भेटीदरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर गेहलोत हे मातोश्री बाहेर आल्यानंतर त्यांना माध्यमांनी भेटीसंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले की, “आम्ही दोघांनी आमच्या राज्यातील राजकीय गप्पा मारल्या. आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडी ही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray ji hosted Rajasthan CM @ashokgehlot51 ji at our residence this morning. It was a real pleasure to interact with him and we look forward to a great bond & relationship with the Hon’ble CM and the state of Rajasthan. pic.twitter.com/YSrRhFPHXH
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 6, 2020
या भेटीनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भेटीचा आनंद व्यक्त केला. “राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना भेटून, संवाद साधून आनंद वाटला. महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल.” असा विश्वास त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.