HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या आठवड्याभरात शरद पवारांशी चर्चा करून विधानपरिषदेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ | राजू शेट्टी

मुंबई | माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवार यांचा हाच निरोप देण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान विधानपरिषदेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती राजू शेट्टींनी स्पष्ट केले.

राजू शेट्टी म्हणाले, ” चार- पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील माझ्या आईची तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी निवासस्थानी आले होते. त्यावेळी आमच्या अनोपचारिक गप्पा झाल्या, त्या जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो मेल पाठविला होता. लोकसभेच्या वेळी जी चर्चा झाली होती. त्यानुसार विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देण्याचे ठरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांच्यासोबत एक बैठक घेऊन निर्णय करण्याचा प्रयत्न करू, अस जयंत पाटील म्हटल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. येत्या आठवड्यातभरात पवारसाहेब यांच्यासोबत बैठक होईल आणि त्या होय किंवा नाही यासंदर्भात निर्णय होईल,” असे राजू शेट्टी म्हणाले.

राज्यपाल नियुक्तीच्या १२ जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ४ पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान राजू शेट्टींना जागा त्यांचे ठरले आहे. यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाझेंची नियुक्ती करू नका म्हणून शरद पवार, राऊत, देशमुखांना भेटलो”,अबू आझमींचा गौप्यस्फोट

News Desk

शिवभोजन थाळीच्या शर्यतीत आता दीनदयाळ थाळी

swarit

आरेतील मेट्रो कारशेडला विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे

News Desk