मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या २०००च्या पार गेली आहे. राज्यातील परिस्थिती पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत राज्याती लॉकडाऊ वाढविल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करत आहे. याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीला आज (१३ एप्रिल) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तररित्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत.
राज्यातील लॉकडाऊनमुळे सर्वांचे मोठे हाल होत आहेत. या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला योग्य हामी भाव मिळात नाही. तर शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला, फळ आणि दूध यांची कमतरता भास आहे. यावर मात करण्यासाठी राजू शेट्टी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना यासंदर्भात नवीन कल्पाना मांडली आहे. राजू शेट्टी म्हणताता की, ज्या सोशल मीडियाद्वारे कोरोनासंदर्भाती अफवा, लोकांच्या चारित्याचे हणन करण्यासाठी वापरत होते. त्या सोशली मीडियाद्वारे समाजाच्या चांगल्या कामासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांनी वापर करावा असे त्यांनी सूचविले आहे.
तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करून प्रश्न सोडवावे
शेतकऱ्यांच्या भाजीपाल्या तितकासा भाव मिळत नाही, याप्रश्नावर बोलतान राजू शेट्टींच्या ही भन्नाट आयडिया देखील एच. डब्ल्यू. मराठीशी मुलाखती सांगितली आहे. ते म्हणाजे “लॉकडाऊनच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील स्मार्ट फोन वापरणाऱ्या तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करत दैनंदिनीचे प्रश्न सोडवावे. ग्रामीण भागातातील तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील शेतमाल आणि शहरी भागातील तरुणानी त्यांच्या सोसायटीमधील किती मालाची अवश्यकता आहे. याबद्द माहिती करून ऐकमेंकाशी संपर्क करत दोन्ही सांगड घालली तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालला योग्य हामी भाव मिळेल आणि शहरी भागातील लोकांन मापक दरात भाजीपाला उपब्लध होईल. या लॉकडाऊनच्या काळात भविष्यातील चांगली व्यवस्था देखील निर्माण होईल. जेणे करून शेतकऱ्यांचे जे नुकसान होते ते होणार नाही.
संपूर्ण मुलाखत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.