HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार राम सातपुते यांना आता राष्ट्रीय राजकारणात संधी

पुणे | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे विश्‍वासू समजले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर नुकतीच निवड झाली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक राहिल्यानेच सातपुते यांना फडणवीस यांनी संधी दिल्याचे दिसत असून या निमित्ताने सातपुते यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी देण्यात येणार असून त्या दृष्टीने पक्षाकडून ही नवी टीम तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर एकूण ७ जणांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून आमदार सातपुते यांच्याबरोबर मधुकेश्‍वर देसाई यांना संधी मिळाली आहे. इतर उपाध्यक्षांमध्ये पश्‍चिम बंगालमधून अनुप कुमार साहा, बिहारमधून मनिष सिंह, ओडिशामधून अर्पिता अपरिाजिता बडजेना,उत्तरप्रदेशमधून अभिनव प्रकाश व उत्तराखंडमधून नेहा जोशी यांची निवड करण्यात आली आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली ही नवी टीम तयार करण्यात आली आहे.

आमदार सातपुते हे महाराष्ठ्र भाजपातील सर्वात तरूण आमदार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री म्हणून काम केल्यानंतर अगदी कमी वयात त्यांना आमदारकीची संधी मिळाली.भाजपाचे आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे.ऊसतोडणी कामगाराचा मुलगा ते पहिल्याच प्रयत्नात आमदार अशी सातपुते यांची ओळख असून नव्या जबाबदारीमुळे आमदार सातपुते यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाईंना फोन करतो”, नितेश राणेंचा गंभीर आरोप

News Desk

…तर राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी !

News Desk

रेल्वेच्या बोगीतील शौचालयाच्या जागी कॅटरिंगचे सामान

News Desk