HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राम शिंदेंनी घेतली उदयनराजेंची भेट

पुणे | भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पुण्यात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नातही उदयनराजे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती राम शिंदे यांनी यावेळी केली. माध्यमांना टाळत उदयनराजे यांनी राम शिंदेंना भेट दिली. ‘धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात माझी नियोजित बैठक खासदार छत्रपती उदयनराजे महाराज यांच्यासोबत झाली. रात्री त्यांना भेटलो, तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विस्तृत आणि तपशीलवार चर्चा झाली’ अशी माहिती राम शिंदे यांनी दिली आहे.

‘धनगर समाजाचा लढा अनेक दिवस चालू आहे. समाजाला आरक्षण मिळत नाहीये. घटनेमध्ये तरतूद आहे, अशा अनेक गोष्टींवर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. उदयनराजेंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्या लढ्याला माझा पाठिंबा असल्याचं आश्वासित केल्याचं राम शिंदेंनी सांगितलं. ‘मला धनगर समाजाविषयी माहिती आहे, त्यामुळे धनगर समजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली’ अशी माहितीही राम शिंदे यांनी दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे यांनी या राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. सर्व पीडित आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सकारात्मक भूमिका घेतली आहे’ असेही शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

https://www.facebook.com/807061526049730/posts/3359037300852127/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी चीन-अतिरेक्यांना उखडून फेका, मग महाविकासआघाडीकडे वळा!

swarit

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

News Desk

जर विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात नक्की यश येईल – छगन भुजबळ

News Desk