HW News Marathi
महाराष्ट्र

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच !

सातारा | “मला जाणता राजा म्हणा असे मी म्हणालो नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार पुढे म्हणाले की, “शिवाजी महाराजांची उपाधी ही छत्रपती हीच होती. जाणता राजा ही शिवाजी महाराजांची उपाधी नव्हती. जाणता राजा ही उपाधी रामदास स्वामींनी जन्मला घातली आहे. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच. राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू होत्या, असे वक्तव्य शरद पवारांनी यावेळी केले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या संसारातून शिवाजी महाराजांचे व्यक्ती महत्व घडले असल्याचेही पवार म्हणाले. पवार हे आज (१५ जानेवारी) साताऱ्या जिल्ह्यातील खटाव-माण अॅग्रो प्रायव्हेट लि. या साखर कारखान्याच्या दोन लाख एकावन्न हजाराव्या साखर पोत्याच्या पूजन सोहळी बोलत होते.

दरम्यान, शरद पवार म्हणाले की, “शिवाजी महाराजांचा कालखंड जर तुम्ही नीट अभ्यासला तर तुम्हाला कळेल की, शिवरायांच्या कालखंडात रामदास स्वामी नव्हतेच, महाराजांसारख्या कतृत्व संपन्न महामानवाला घडविण्याचे काम रामदास स्वामींनी केली, अशी लेखणींची कमाल कोणी तरी गेली. आणि आम्ही माणायला लागलो की, शिवाजी महाराजांचे नेतृत्व रामदास स्वामींमुळे आहे. हे खरे नव्हे महाराजांचे कर्तृत्व हे स्व:कर्तृत्व आहे. महाराजवर मार्गदर्शन आणि मातीचे संस्कार होते. तसेच छत्रपती हे जन्माने आणि अंतकरणाने छत्रपती राहतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन नंबर

News Desk

MHCET परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

अजित पवारांनी केली संजय राठोड यांची पाठराखण आणि म्हणाले…

News Desk