HW News Marathi
महाराष्ट्र

‘राऊतांना राणे दोषाची काविळ झाली आहे’, प्रवीण दरेकरांचा टोला!

मुंबई।भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग पदाची शपथ घेतली आणि पदभार स्वीकारला. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदी कॅबिनेटचा अपमान आहे, असं म्हटलंय. त्यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत हे प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही. राणे साहेबांना मिळालेलं खातं छोटं आहे की मोठं हे येणाऱ्या काळात ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे. म्हणून संजय राऊतांना राणे साहेबांचं खातं छोटचं वाटणार असा टोला प्रवीण दरेकर यांनी राऊतांना लगावलाय.

राणे दोषाची काविळ झाली आहे?

मोदी सरकराच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडला. त्यात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राऊत यांना राणे साहेबांना काही मिळाले तरी ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा पलटवार प्रवीण दरेकरांनी केला आहे.

नारायण राणे यांना मिळालेलं खातं छोट आहे,की मोठं हे येणाऱ्या काळामध्ये राणेसाहेब त्यांच्या कार्यपध्दतीतुन दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम ते नक्की केलं असतं, असा विश्वासही यावेळी प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय.

मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच झाडाझडती-

मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच झाडाझडती सुरू केली. राणे यांनी अधिका-यांचा क्लास घेतला. मला न सांगता तुम्हाला सुट्टी घेता येणार नाही, असे बजावले आहे. इथून पुढे मंत्र्याला न विचारता अधिका-यांनी सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांना पण हजेरी लावण्याची सक्ती केली आहे. दरम्यान, एमएसएमई अंतर्गत किती रोजगार दिला, याचीही माहिती त्यांनी घेतली. आत्मनिर्भर भारत अभियान कसं राबविलं आणि जीडीपीत एमएसएमईचा किती वाटा, याची माहिती राणे यांनी यावेळी घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जाला कंटाळून यवतमाळच्या शेतक-याची आत्महत्या

News Desk

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक! – उद्धव ठाकरे

Aprna

साखरेच्या गोडव्याने अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यातील कटुता संपली? पाटील- पवार यांच्यात गुफ्तगु..

Arati More