टोक्यो। टोक्यो ऑलीम्पिकमध्ये कुस्तीपट्टू रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. विजया नंतर त्याने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रवी म्हणाला, ”माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या देशवासियांचे, माझ्या प्रशिक्षकांचे आणि पाठिंबा देणाऱ्या महासंघाचे मला आभार मानायचे आहेत. मी आनंदी आहे, पण समाधानी नाही, कारण मी सुवर्णपदकाचे ध्येय ठेवले होते. मी देशाला अभिमान वाटेल अशी अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.”
भारताच्या झोळीत अजून एक पदक
भारताला आता पर्यंत ५ पदक मिळाले आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी करत भारताच्या झोळीत अजून एक पदक ठेवले. एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकल्यानंतर पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची आशा भारताला होती. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर रवीने देशवासियांचे आभार मानले.
I'd like to thank people of the country for praying for me& my coaches and federation for supporting me. I'm happy but not satisfied as I was aiming for gold. I'll try to perform better and make the country proud: Wrestler Ravi Dahiya, on winning a silver medal at #TokyoOlympics pic.twitter.com/jI3tgvvgHe
— ANI (@ANI) August 5, 2021
बक्षींचा वर्षाव
रवीकुमारच्या कामगिरीमुळे त्याच्यावर बक्षीचांचा आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे. रवीने ऑलिम्पिक पदक जिंकावे म्हणून त्याच्या गावातील लोकही देव पाण्यात ठेऊन बसले होते. रवीच्या या रौप्यपदकामुळे गावाचेही नशीब पालटणार आहे. ४ कोटी रुपये, नोकरी, गावात स्टेडियम आणि राज्यात कुठेही रवीच्या इच्छेप्रमाणे तो सांगेल त्या भागात ५० टक्के सवलतीमध्ये जमीन असा बक्षिसांचा पाऊसच हरयाणा सरकारने आपल्या या सुपुत्रावर पाडला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.