HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मंत्री धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात, राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट लिहत परस्पर सहमतीने करुणा शर्माशी माझे संबंध आहेत तसंच आम्हाला दोन मुलेही आहेत, असं सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

शिवसेनेची प्रतिक्रिया 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे शिवसेना मेळाव्यासाठी आले होते. यावेळी मेळावा पार पडल्यानंतर पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला. मात्र यावर बोलण्यास एकनाथ शिंदे यांनी टाळलं. ‘नो कॉमेंट्स’ असं म्हणत त्यांनी याविषयावर कोणतंही मत व्यक्त केलं नाही.

कॉंग्रेसची प्रतिक्रिया 

दुसरीकडे हिंदु धर्मात दोन लग्न किंवा पत्नी पत्नी कायद्याने गुन्हा आहे, अशी भूमिका भाजपच्या महिला आघाडीने घेत मुंडे यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपला टोला लगावलाय. “भाजप महिला आघाडीच्या भूमिकेनंतर भाजपच्या नेत्यांना आता टेन्शन आलं असेल”, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिक्रिया 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.हा धनंजय मुंडे यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. या प्रकरणाची सतत्या पडतळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे भरणे यांनी सांगितले.

Related posts

पालकमंत्री राम शिंदे यांचा शेतक-यांना अजब सल्ला !

News Desk

मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घ्या, पत्राद्वारे संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

PMC बॅंक घोटाळ्याप्रकरणी महाविकासआघाडीचा मोठा निर्णय !

News Desk