HW News Marathi
महाराष्ट्र

महिला तहसीलदाराचा ‘हिरोईन’ म्हणून उल्लेख, बबनराव लोणीकरांचे बेताल वक्तव्य

जालना | “शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच,” असे बेताल वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर गावातील एका जाहीर कार्यक्रमात बबनराव लोणीकर बोलत होते. जालन्यातील परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात महिला तहसिलदारांचा थेट हिरोईन असा उल्लेख केला. लोणीकरांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“बबनराव लोणीकर जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी या हिरोईन तर आहेतच. पण त्याची काळजी करून नका, पण तुमच्या सारखे व्हीलन आजू-बाजुला असेल. तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला वेळ लागणार नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. चाकणकर पुढे म्हणाल्या की, ” सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून तुमची गेली नाही. त्यामुळे बोलताना भान ठेवून आणि वक्तव्य करताना जबाबदारीने करा.”

बबनराव लोणीकर नेमके काय म्हणाले

लोणीकर म्हणाले की, “सरकारकडून २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोक आणेल, ५० हजार लोक आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचे तुम्हाला वाटले तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटले. तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील, असे भाषण बबनराव लोणीकरांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे ‘कोरोना रुग्णालया’त रुपांतर !

News Desk

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी फडणवीसांचा सरकारला ‘हा’ सल्ला

News Desk

सेनेने बाळासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी महायुतीत यावे – रामदास आठवले

News Desk