मुंबई । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या आमदार आणि खासदार यांना पक्षाने ‘रिपोर्ट कार्ड’ सोपविले आहे. भाजपची ही बैठक मंगळवारी सायंकाळी वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. ‘प्रत्येक जणाने अहवाल नीट वाचावा, अजूनही वर्षभराचा काळा हाती असून प्रत्येकाने आपल्या परीने कामे करण्याचा प्रयत्न केला असला तरी ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जनतेसमोर जायाचे’, असल्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि खासदारांच्या हातात दोन पाकिटे देण्यात आली. त्यापैकी एका पाकिटात राज्य सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामगिरी आणि विविध शासकीय योजनांची माहिती होती. तर दुस-या पाकिटात भाजपच्या आमदारांबद्दल जनतेच्या मनात काय भावना आहेत. जनतेची कोणत्या पक्षाला पसंत करते, कोणता नेता आवडतो, कोणत्या मतदारसंघात आमदाराची लोकप्रियता कशी आणि किती आहे, हे अहवालात नमूद होते.
आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघांमध्ये कोणकोणते समाज भाजपच्या बाजूने उभा असून कोणते नेते विरोधात जाऊ शकतात, जनता आमदार आणि खासदारांच्या कोणत्या कामांवर खूश आहेत, याचीही माहिती सर्वेक्षणात देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.