HW News Marathi
महाराष्ट्र

गिरीश महाजनांच्या वेगाने दोरउड्या, कार्यकर्तेही झाले अवाक!

जळगाव। भाजप नेते गिरीश महाजन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. राजकारणापलीकडे अनेक कामांमुळे महाजन यांचे नाव चर्चेत येत असते. सध्या गिरीश महाजन यांचा वेगाने दोरीउड्या मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गिरीश महाजन कधी एखाद्या समारंभात गाण्याच्या ठेक्यावर नाचताना दिसतात तर कधी बिबट्याचा माग काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे चर्चेत आले आहेत. असेच जामनेरमध्ये एका कार्यकर्त्याच्या व्यायाम शाळेच्या पाहणीदरम्यान गिरीश महाजन यांनी वेगाने दोरीउड्या मारल्या आहेत. महाजन यांच्या दोरीउड्या पाहून उपस्थित कार्यकर्ते आवाक झाले. तसेच महाजन यांच्या दोरीउड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.

दोरीउड्या मारल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाले

भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी गिरीश महाजन यांनी दोरीउड्या मारल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाले आहेत. गिरीश महाजन जामनगरमध्ये गीताई व्याया शाळेच्या पाहणीसाठी गेलो होते. या व्यायाम शाळेत गेल्यानंतर गिरीश महाजन यांना व्यायाम करण्याचा मोह आवरला नाही. महाजन यांनी तेथील दोर घेतले आणि शर्ट पँटमध्येच वेगाने दोरउड्या मारायला सुरुवात केली. फिटनेससाठी गिरीश महाजन रोज दोरीउड्या मारतात असे त्यांनी म्हटलं होते. यामुळे कार्यकर्त्यांनीही त्यांना दोरीउड्या मारण्याची विनंती केली होती.

फिटनेससाठी रोज १ हजार दोरउड्या घेतात

गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी व्यायाम शाळेल्या भेट देण्याचा आग्रह केला होता. कार्यकर्त्यांच्या विनंतीस मान देत गिरीश महाजन व्यायाम शाळेत पोहोचले. व्यायाम शाळेची पाहणी केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना दोरउड्या मारण्याची विनंती केली होती. कार्यकर्त्यांकडून खूप आग्रह केल्यामुळे दोरउड्यांचे प्रात्यक्षिक गिरीश महाजन यांनी करुन दाखवले. गिरीश महाजन यांनी दोरउड्या घेताना एकदाही न अडखळता सलग ५०० दोरउड्या घेतल्या आहेत. गिरीश महाजन फिटनेससाठी रोज १ हजार दोरउड्या घेतात असे स्वतः महाजन यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींनी ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी! – बाळासाहेब थोरात

Aprna

भाजपमधून आऊटगोईंग सुरु,२०० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान आणि खोट्यांचे पितळ उघडं पडलं…

News Desk