HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स फेरी सेवेला लवकरच प्रारंभ

मुंबई | मांडवा ते अलिबाग या २१ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती द्यावी. सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने या कामात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स फेरी सेवेसंदर्भात विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

‘मांडवा जेट्टी येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.मांडवा येथील जेट्टीजवळील अतिक्रमण दूर करावे. वाहनतळाचा विस्तार करावा. स्वच्छतागृहे व प्रथमोपचार इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स फेरी सेवा पावसाळ्यातही सुरू राहावी’, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स फेरी सेवा करण्यासंदर्भात यंत्रणेची तयारी व ही सेवा लवकरात लवकर कशी सुरू करता येईल याविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई मेरिटाइम बोर्डाने यावेळी रो – पॅक्स फेरी सेवेसंदर्भात सादरीकरणही केले.

मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर रस्तामार्गे गेल्यास १०९ किलोमीटर इतके आहे आणि या प्रवासासाठी सुमारे ३ तास लागतात. परंतु भाऊचा धक्का ते मांडवा रो -पॅक्स फेरी सेवेद्वारे जलमार्गाने प्रवास केल्यास केवळ ४५ मिनिटांमध्ये भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर पार करता येवू शकणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत करण्यात आले आहे. केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्यशासनाकडून ५०-५० टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो- पेक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे. ५०० प्रवासी आणि १८० वाहने घेऊन जाण्याची या जहाजाची क्षमता आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामास्वामी एन., कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, रायगडच्या जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी तसेच एस्क्वायेर शिपिंग अँड ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधीही यावेळेस उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

News Desk

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Aprna

हरिश्चंद्र गडावर अडकलेल्या ट्रेकर्सची गड उतरण्यास सुरुवात

News Desk