HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरत नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगड आणि गाजरे फेकल्याची घटना घडली आहे. सदाभाऊ हे पंढरपूरहून बार्शी येथील कुर्डुवाडीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हा हल्ला केला.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच, त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीसमोर गाजरे देखील फेकली गेली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी सदाभाऊच्या कार्यालयाची तोडफोड आणि त्यांचा पुतळा जाळण्यात आला. काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडावा लागला होतात्यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर हल्ला का केला. याचे कारण अद्याप ही कळू शकले नाही. याचा तपास पोलीस करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोप

Aprna

महापौरपदाची सोडत जाहीर

News Desk

भाजपने ‘जेल भरो’ आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले स्थगित

News Desk