HW News Marathi
महाराष्ट्र

‘आता पेट्रोलही १०५ वर थांबेल’, रोहिणी खडसेंचं सूचक ट्विट

मुंबई | कोरोनामुळे देशात, राज्यात लॉकडाऊन आहे. आधीच यामुळे त्रस्त झालेल्या देशातील जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढतच असल्याने त्याचा परिणाम थैट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. पेट्रोलने शंभरील पार केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, आता पेट्रोलने चक्क १०५ चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

पेट्रोल दरवाढीनंतर दिल्लीत आज पेट्रोल ९९.१६ रुपयांवर पोहोचले आहे. तर, दिल्लीत डिझेल ८९.१८ रुपये प्रती लीटर विकले जात आहे. तुलनेनं मुंबईत पेट्रोलचे दर १०५ रुपयांवर पोहोचले आहेत. भाजपाने विधानसभा निवडणुकीत १०५ विजयी आमदारांचे संख्याबळ गाठले होते. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला होता. मात्र, महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पेट्रोल दरवाढीवरुन भाजपला खोचक टोला लगावला आहे. अरे पेट्रोल पण पोहोचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते.. असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले आहे. भाजप आमदारांच्या संख्याबळाएवढा पेट्रोलचा प्रति लिटरचा दर आहे, त्यावरुन रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान, रोहिणी खडसे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपवर टीका करतात. यापूर्वीही ओबीसी आंदोलनावरुन त्यांनी भाजपवर टीका केली होती.

 

ओबीसींच्या आरक्षणावरुनही फडणवीसांना केलं लक्ष्य

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असे म्हणत भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराच देण्यात आला होता. त्यावरुन रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला होता. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या दारी, विमानतळासाठी सुचवलं ‘हे’ नाव

News Desk

पाहा व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कळंबमध्ये 1075 फुट ऐतिहासिक तिरंगा ध्वज रॅली

Aprna

राज्यपालांकडे गोव्याचाही प्रभार आहे, तिकडे दारुची दुकाने उघडी आणि मंदिरे बंद आहेत…थोरात

News Desk