HW News Marathi
महाराष्ट्र

‘बंड्यातात्या कराडकरांच्या अटकेवर फडणवीसांचा निषेध, सरकारला सुनावले बोल

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आषाढीवर निर्बंध लावले आहेत. वारीसाठी मोजक्या मानाच्या १० पालख्या पंढरपुरात जातील आणि मोजकीच लोकं पालखीसोबत जातील असं आदेश सरकारने दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पायी पालख्यांसाठी सरकारने मनाई केली आहे. मनाई असतानाही बंड्यातात्या पायी गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

फडणवीसांनी निषेध दर्शवला आहे

महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये वादविवाद नेहमीच सुरूच असतात. नवीन वादाचं कारण म्हणजे

बंड्यातात्या कराडकर यांच्या अटकेचा आहे. बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान?, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी सरकारला केले आहेत.

बंड्यातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक

या सर्व नियमांना झुगारून पंढरपूरला पायी जात असलेल्या बंड्यातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. मात्र बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काय म्हणाले आचार्य तुषार भोसले?

दरम्यान, बंडातात्यांच्या अटकेनंतर मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे, असं म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपच्या या नेत्यांवर गुन्हा दाखल

News Desk

महाराष्ट्राची नाही तुमची निंदा करते, कंगनाचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर!

News Desk

“वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का?”, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

News Desk