HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही,अभ्यास करू बोलावं ! फडणवीसांचा सल्ला ..

सातारा | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जीएसटी संदर्भात भाजप सरकारवर जोरदार टिका केली होती.ते म्हणाले होते की , सगळ्या गोष्टीचं क्रेडिट घेणारं केंद्र सरकार स्वतःच्या अंगावर आलं की राज्यांनाक्रेडिटघ्यायला सांगत आहे. हे फक्त राज्याच्याहक्काच्या GST च्या बाबतीतच नाही तर इतरही अनेक गोष्टीत पहायला मिळतं. असं कसं चालेल?. रोहित पवारांच्या या टीकेलाभाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस यांनी रोहित पवारांवर बोलताना म्हटलंय की , राज्याचे कुठलेही पैसे केंद्राकडे अडकून नाहीत. रोहित पवार यांना हिशेबसमजत नाही.’ फडणवीसांच्या या प्रत्युत्तरानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

भाजप कुठल्याही विषयावर राजकारण करु शकते असे माझे मत आहे. उद्याचे आंदोलनही राजकारण डोक्यात ठेवूनच ते आंदोलन करतअसतील असं मला वाटते. खरंच त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा कळवळा असता तर भाजपचे नेते जीएसटीच्या प्रश्नावर केंद्र शासनाशीबोलले असते. भाजपने घाईगडबडीत एलबीटी रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे 26 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ते पैसेकेंद्राकडून मिळाले असते तर महाराष्ट्रातील जनतेवर जनतेच्या आरोग्यावर तो पैसा खर्च केला असता. पण त्यावर केंद्राची किंबहुनाकेंद्रातील मंत्र्यांसोबत बोलण्याची भीती त्यांना वाटते. त्यामुळे ते बघत नसावेत,’ असा हल्लाबोल रोहित पवार यांनी नगरमध्ये बोलतानाकेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो – संजय राऊत

News Desk

राहुल आणि प्रियांका गांधी पायी हाथरसला रवाना…

News Desk

जेईई, नीट तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

News Desk