‘आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत’ असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर पुढच्या ५ वर्षांत सत्तेसाठी चंद्रकांत पाटीलचं शिवसेनेत येतील असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला
मुंबई| राज्यात एकीकडे ॲापरेशन लोटसची चर्चा सुरू असताना महाविकासआघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास सत्ताधारी व्यक्त करतायतं.मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट सेनेला ॲाफर दिली की,राज्याच्या हितासाठी आम्ही सेनेसोबत येण्यासाठी तयार आहोत .यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!
आतातरी राजकारण थांबवा!
आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!
आतातरी राजकारण थांबवा!— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.