अहमदनगर | भाजपचे नेते आणि माजी आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहिच पवार यांच्यावर ३० लाखांच्या बक्षीसावरुन टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. गावात गटतट नसावेत असा माझा प्रामाणिक उद्देश आहे पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी शिंदे यांना दिलं आहे.“गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे”, असा सवाल त्यांनी राम शिंदे यांना केला.
“बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी तट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु”, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.“एकतर राम शिंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, असा टोला लगावत लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राम शिंदे ?
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले. मात्र असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली होता. रोहित यांच्या प्रलोभनाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी राम शिंदे यांनी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.