HW News Marathi
Covid-19

धारावीतील आरोग्य यंत्रणेला RSS चे कार्यकर्ते करणार मदत

मुंबई | देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. आणि त्यातही मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. मुंबईत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार झाले. त्यात मुंबईतील धारावीत अनेक रुग्ण एकामागून एक सापडू लागले. आता धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली निरामय सेवा फाउंडेशन, सेवांकुर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तब्बल ५०० कार्यकर्ते कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. धारावीच्या कामराज इंग्लिश हायस्कूलमध्ये हे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

दरम्यान, सध्या धारावीत कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात सापडत आहेत. जिथे दिवसाला कोरोनाचे ७० ते ९० नवे रुग्ण सापडत होते. तिथे, गेल्या काही दिवसांपासून धारावीतील रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या ८ दिवसांत धारावीतील नव्या रुग्णांचा आकडा २५ च्या पुढे गेला नाही आहे. काल (७ जून) धारावीत केवळ १० नवे रुग्ण सापडले. याशिवाय, ३० मे नंतर धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आता हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना उपचारासाठी रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारचा ‘हा’ निर्णय

News Desk

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती!

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत ५,०११ नवे रुग्ण

News Desk