HW News Marathi
Covid-19

मंत्र्यांनो हवेत गोळीबार नको, आता जमिनीवर या !

मुंबई । “मंत्र्यांनो, खोटी माहिती देऊन हवेत गोळीबार करू नका. आता हवेतून जमिनीवर या”, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील भीषण कोरोनास्थितीबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी हा निशाणा साधला. “ना रेमडेसिवीर, ना ऑक्सिजन. प्रशासन फक्त जनतेची दिशाभूल करत आहे. इथे ऑक्सिजन नसल्याने ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही मंत्री म्हणतात जिल्ह्यात कशाचीच कमतरता नाही. मंत्र्यांनो, खोटी माहिती देऊन हवेत गोळीबार करू नका”, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी सुनावले आहे.

सदाभाऊ खोत सांगलीतील स्थितीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “सांगली जिल्हा कोरोनाची स्मशानभूमी होत आहे. ६ महिन्यांपूर्वीच आम्ही ऑक्सिजन प्लांट उभा करा म्हणून मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा गुजरातमधून येणार होता. हा साठा आला असता तर रुग्णांना इंजेक्शन मिळाले असते. पण त्या उद्योजकाला रात्रीच उचलून धमकावण्यात आले. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. अशाने राज्यातील उद्योजक राज्याबाहेर जातील. या सरकारने राज्यात ठोकशाही सुरू केली आहे”, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. “जयंत पाटील हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय पालकमंत्री मंत्री आहेत. इतिहासात नोंद होईल”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालावरही सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला जी साद दिली होती त्याला प्रतिसाद दिला आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता कोरोना वॉरियर्संना कामसाठी पाच दिवसांचा आठवडा

News Desk

महाराष्ट्रात आज ७,०७४ नवे कोरोना रुग्ण आढळले, राज्याने ओलांडला २ लाखांचा टप्पा

News Desk

मोदी सरकारने साखर उद्योगाला चालना देशासाठी पवारांनी सुचवले ‘हे’ पर्याय

News Desk