HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजीराजेंची खासदार निधीतून पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

कोल्हापूर | राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संभाजीराजेंनी त्यांच्या खासदार निधीतून ५ कोटींची मदत जाहीर केली आहे. संभाजीराजे यांनी यांची माहिती आज (१२ ऑगस्ट) दिली आहे.

संभाजीराजे यांनी ट्वीटर हँडलवरून ट्वीटकर यासंदर्भातील माहिती दिली आहे. संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझे संपूर्ण जीवनच समर्पित आहे.”

बचावकार्यामध्ये लक्ष घालून आहेत. त्यांनी काल मदतकार्याची माहिती देताना फेसबुकवरून सांगितले, की कोल्हापूर शहर व आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावांतील पाणी ओसरत असले, तरी शिरोळ तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. विशाखापट्टणम येथून १३ बोटी मागवण्यात आल्या असून त्याही शिरोळला देणार आहे. तर राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे.

तसेच शिर्डीच्या साई संस्थानानेदेखील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. तसेच डॉक्टरांची टीम औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्विट करून दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय महाराष्ट्र सरकारचा नाही! – जयंत पाटील

News Desk

यशोमती ठाकूरांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, खिसे गरम करण्यासाठी…चित्रा वाघ यांची टिका !

News Desk

“बीएमसीच्या फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण पूर्ण नाही!,” ठाकरेंवर राणेंची टीका

News Desk