HW News Marathi
Covid-19

सांगलीत आजपासून काय सुरु काय बंद? जाणून घ्या…

सांगली | राज्यात आजपासून (७ जून) अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ५ टप्प्यांत हा अनलॉक होणार आहे. या प्रमाणे सांगली जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 11.50 टक्क्यांवर आल्याने अत्यावश्यक सेवेतील घटकांना आणखीन शिथिलता देण्यात आली आहे. वृत्तपत्र व्यवसाय, किराणा, भाजीपाला, कृषी उत्पन्न बाजार समिती, जीवनावश्यक वस्तू यासह अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहारांना दुपारी ४ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. परंतु शहरातील व ग्रामीण भागातील आठवड्या बाजारांना मात्र बंदी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या पॉझिटिव्हीटी अहवालानुसार जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध दि. 7 जून ते दि. 14 जून पर्यंत वाढविण्यात येत आहेत. परंतु यामध्ये थोडी शिथिलता देण्यात आली असून सध्या सुरू असलेल्या सेवांना सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत व्यापार करण्यास मुभा देण्यात येत आहे. तसेच रुग्णालये, लसीकरण केंद्रे, औषध दुकाने, व्हेटीनरी हॉस्पिटल इत्यादींची सेवा अविरत सुरू राहणार आहे.

काय सुरु आणि काय बंद राहणार?

  • किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स, मटन, चिकन, अंडी इत्यादींची दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केटमधील सर्व व्यवहारांना दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
  • दुकानातून घरपोच सेवा देण्यासाठी मात्र रात्री 8 वाजेपर्यंत पर्यंत मुभा देण्यात आली आहे.
  • परंतु किराणा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी माल घेणे अथवा पाठविण्याठी तसेच दूध संकलन, वाहतूक इत्यादीसाठी वेळेचे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.
  • जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजी मंडई सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. परंतु शहर व ग्रामीण भागातील आठवडा बाजार मात्र बंदच राहतील. तसेच शीतगृहे, गोदाम, सार्वजनीक वाहतूक इत्यादी सुरू राहतील.
  • शेती विषयक दुकाने तसेच बियाणे, खते, शेती विषय उपकरणे, पशुखाद्य दुकाने यांच्या दुकांना देखील दुपारी 4 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
  • हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना पार्सल सेवेसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत परवागी देण्यात आली आहे. परंतु ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रतिबंध असेल. तसेच सिनेमागृहे, नाट्यगृहे, सभागृहे, व्हिडीओ गेम पार्लर, इतर दुकाने, मॉल इत्यादी बंदच असणार आहेत.
  • सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायलकल चालविण्यासाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु शनिवार व रविवारी प्रतिबंध करण्यात आले आहे.
  • तसेच केशकर्तनालये, सलून, ब्युटी पार्लस, व्यायामशाळा यांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेची अट घालून परवानगी देण्यात आली आहे. परंतु धार्मिकस्थळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी मात्र बंदच राहणार आहेत.
  • मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरु राहतील. केवळ गॅरेला पुरवठा करण्यासाठी स्पेअरपार्ट दुकानधारकांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु दुकाने सुरू ठेवून साहित्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान नाही, तर भारताला मोजावी लागणार ‘एवढी’ रक्कम

News Desk

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk

होरायझन प्राईम हॉस्पिटलची कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द, अवाजवी बील आकरल्याने पालिकेचा दणका !

News Desk