HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरे म्हणाले, “अब मेरे साथ दो और साथी” त्यावर मोदी म्हणाले…! राऊतांनी दिला तपशील

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. मात्र, या भेटीनंतर ठाकरे आणि मोदी यांची वैयक्तिक भेट झाली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या भेटीबद्दल गेले अनेक दिवस विविध तर्क वितर्क लावले जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मोदी-ठाकरे वैयक्तिक भेटीविषयीचा तपशील दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी याविषयीचा खुलासा केला आहे.

ठाकरे – मोदी भेटीविषयीचा तपशील देताना संजय राऊत म्हणतात की, पंतप्रधान मोदी यांच्याशी आपला उत्तम संवाद आहे, चिंता नसावी. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधानांना थेट फोन लावला. मोदी लगेचच फोनवर आले. राज्याची खुशाली विचारली. “मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात भेटायचे आहे. अब मेरे साथ दो और साथी है, उनको भी साथ लाना है”, असे उद्धव ठाकरे यांनी मोदींना म्हटले. त्यावर पंतप्रधानांनी लगेच “हो, वेळ देतो” असे म्हटले. त्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाने बुधवारची वेळ नक्की केली. तसेच कोणाच्याही मध्यस्थीशिवाय मोदी-ठाकरे भेट झाली हे महत्त्वाचे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणाचा विषय आता केंद्राच्या अखत्यारीतला, असा संदेश पोहोचला !

त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अचानक दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींना भेटून आले. मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांना साकडे घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन सहकारी देखील उपस्थित होते. संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारीतला असून पंतप्रधानांना या प्रश्नापासून दूर राहता येणार नाही, हा संदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. दुसरा एक राजकीय संदेश राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्षांसाठी आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या धसमुसळेपणाला केंद्रीय नेत्यांचा खरेच पाठिंबा आहे काय?

संजय राऊतांनी पुढे एक खोचक सवालही उपस्थित करत भाजपवर निशाणा देखील साधला आहे. संजय राऊत म्हणतात, “महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता स्थापन करायची आहे. पण महाराष्ट्रातील नेत्यांच्या धसमुसळेपणास त्यांच्या केंद्रीय नेत्यांचा खरेच पाठिंबा आहे काय? प. बंगालात अमित शहा यांनी साम, दाम, दंड, भेद असा वापर करूनही त्यांच्या रणनीतीचे पुरते बारा वाजले. आता इतर राज्यांत धोका पत्करून प्रतिष्ठा पणाला लावण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर केंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचा GST परतावा मिळाला

News Desk

महाराष्ट्रासाठी आंध्रप्रदेशकडून मदतीचा हात ! ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा

News Desk

चाकरमान्यांनो खुशखबर | गणेशोत्वाकरिता मूंबईहून कोकणासाठी धावणार विशेष रेल्वे  

News Desk