HW News Marathi
महाराष्ट्र

“बेळगावमध्ये बऱ्याच वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु, आता इथं माकडांचं काम नाही”

बेळगाव | एकीकडे पंढरपूर मंगळवेढा निवडणूकींचे तयारी सुरु असताना दुसरीकडे बेळगाव लोकसभा निवडणूकीचीही जय्यत तयारी सुरु आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बेळगावात गेले आहेत. संजय राऊत बेळगावात पोहचताच बेळगावचं वातावरण तापलं आहे. संजय राऊत येण्याच्या आधीच संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडलं गेलं. त्यानंतर देखील संजय राऊत यांनी सभा घेतली. त्यात त्यांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला होता.

महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवाजी महाराज नसते तर, पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकापर्यंत आल्या असत्या. तुमची सुंता झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

संजय राऊत यांनी बेळगावात उतरल्यानंतर एक ट्विट केले होते. बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात केली आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले. तरीही सभा होणारच !, गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झाली आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…पण तेव्हा कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही

News Desk

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

News Desk

अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांची खंत

Aprna