HW News Marathi
महाराष्ट्र

‘….म्हणून प्रचाराला गेलो नाही’, बेळगाव निवडणुकांबद्दल संजय राऊत म्हणाले…..

मुंबई | बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक आज(३ सप्टेंबर) रोजी होणार आहे. या निवडणुकीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावेळी बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगाव पालिकेवर छत्रपती हंसिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलयं विकास आघाडी’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता

News Desk

कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे

News Desk

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

News Desk