HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं…राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप  

मुंबई | दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सर्वच स्तरांतून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचाही मृत्यू झाल्यानं राज्यातही खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“सरकारनं एक प्रकारची दडपशाही सुरू केली आहे. लाल किल्ल्यावर जे शेतकरी घुसले, असं म्हणतायत. ते खरोखर शेतकरी होते का असा प्रश्न निर्माण होतोय. लाल किल्यावर शेतकरी नव्हते फूस लावून काही जणांना पाठवण्यात आले होते. ते आता कुठे फरार झाले आहेत, कुठे गायब झाले आहेत, त्याचा आधी तपास करावा”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“जे आता फोटो आलेले आहेत, त्यात ते पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर आहेत. जे सिद्धू वगैरे लोक आहेत, ते कोण आहेत, कोणाचे आहेत. त्याचा तपास आधी करा. ते कुठे गायब झालेले आहेत, पण सरकारला यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय. दडपशाही करायची आहे. त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडून त्यातील एक गट जो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन घुसला होता”, असा आरोपही संजय राऊत यांनी केली आहे.

“ते लाल किल्ल्यावर गेले होते. त्यांनी हडकम माजवला. आज आंदोलनात फूट पडल्याचं चित्र निर्माण करण्यात आलंय. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना बघून घेऊ, पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. अधिवेशन सुरू होत आहे, पहिल्या दिवसापासून सरकारला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील”, असंही संजय राऊतांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaViru : एमसीएची सीईटी परीक्षा ३० एप्रिलला होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

swarit

आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिल्यानंतर खासदार संभाजीराजेंची भूमिका!

News Desk

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk