HW News Marathi
महाराष्ट्र

‘दारुच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात’, राऊतांचा भाजपवर टोला

नवी दिल्ली | मंत्रालयात काल(१० ऑगस्ट) दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. या मुद्यावरून विरोधी पक्ष आता ठाकरे सरकार वर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात सापडलेल्या दारुच्या बाटल्यांच्या मुद्द्यावरून भाजपला फैलावर घेतलं आहे. त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात. भाजपने या बाटल्या लॅबमध्ये नेऊन तपासाव्यात. त्या किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय?

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याने भाजपने महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊतांनी त्यांना फैलावर घेतलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा. आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत.

कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं राऊत म्हणाले आहेत.

कल्चरची वाट लावली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुद्यावरून भाष्य केलं आहे. दारुच्या बाटल्या सापडणं गंभीर आहे. या घटनेची राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. कोविडच्या बंधनातून दारुच्या बाटल्या मंत्रालयात कशा गेल्या हा विषय नाही. हा कल्चरचा विषय आहे. मंदिरं बंद ठेवून दारूची दुकाने सुरू केली तिथेच कल्चरची वाट लावली. मंदिरांपेक्षा दारूंना महत्त्व प्राप्त झालं. ऑलरेडी गटारीच झाली आहे, असा हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला होता.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील या मुद्यावरून सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन १५ दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव अभिवादनासाठी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद १ जानेवारीला उपस्थित राहणार

News Desk

भुसावळमध्ये गोळीबार, भाजपच्या नगरसेवकासह ४ जणांचा मृत्यू

News Desk

स्वार्थापोटी का होईना पण किशोरीताई…; नितेश राणेंचा दिशा प्रकरणावरून महापौरांना टोला

Manasi Devkar