HW News Marathi
महाराष्ट्र

हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, राठोड प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया  

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले आहे.

राऊत म्हणाले की, हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील. दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना संजय राठोडांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही, तुम्हाला याची जास्त माहिती असेल. त्यामुळे आज मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. या बैठकीत काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादच्या नामांतरावरुन मराठा समाज आक्रमक, बाळासाहेब थोरातांच्या फोटोला मारले जोडे

News Desk

“बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला!” – शरद पवार

News Desk

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

News Desk