HW News Marathi
महाराष्ट्र

“नायकासोबत खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो”, राऊतांनी केले विरोधकांचं कौतुक  

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा २०२१ पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

राऊत आज (११ मार्च) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार, या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील सरकारचं २०२४ नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस आज सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.फडणवीसांनी सामनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “सामना वाचतात हे त्यांनी कबुल केलं. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो”.

“अधिवेशनात विरोधी पक्षाने उत्तम कामगिरी केली. खरं खोट काय ते नंबर बघू…ही विरोधी पक्षाची भूमिका पुढील साडे तीन वर्ष त्यांनी उत्तम प्रकारे वठवावी. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन महिन्यात सरकार येईल असं म्हटलं आहे. चांगला विनोद करतात ते…लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल. सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपाने त्याबाबत चिंता करु नये. उत्तम विरोधी पक्षाची भूमिका ते निभावत असून त्यांनी त्यात कायम राहावं,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “कधी कधी खलनायकसुद्धा सिनेमा पुढे घेऊन जातो. नायकासोबत खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फूले, राजशेखर असे अनेक होते. त्यांच्यावर सुद्ध सिनेमा चालत असे. महाआघाडी असल्याने हा महासिनेमा आहे. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखे कलाकार असतात. त्यांनी आपली भूमिका वठवली आहे. पुढील साडे तीन वर्ष या राज्यातील वातावरण खेळीमेळीचं आणि हसतमुख राहील”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

Gauri Tilekar

पालकमंत्री जयंत पाटील पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी…

News Desk

गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवा! – एकनाथ खडसे

Aprna