मुंबई | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. राऊतांच्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. यानंतर संजय राऊतांनी त्यांचे विधान अखेर मागे घेतले आहे. राऊत म्हणाले की, “कोणाच्या भावना दुखाविल्या असतील तर विधान मागे घेतो. इंदिरा गांधींचे वक्तव्य भंग होईल असे कोणतेही विधान केले नाही,” असेही राऊत म्हणाले. इंदिरा गांधींबद्दल आदर कायम, असेही राऊतांनी नमुद केले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena on his statement 'Indira Gandhi used to go & meet Karim Lala (underworld don)': Our friends from Congress need not feel hurt. If someone feels that my statement has hurt the image of Indira Gandhi ji or hurt someone's feelings, I take back my statement. pic.twitter.com/7fV6Y4KyhU
— ANI (@ANI) January 16, 2020
दरम्यान, “जेव्हा इंदिरा गांधींविषयी कोणी टीका टिपणी करत असे, तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र गप्प बसायचे, पण मी त्यांची बाजू उचलून धरायचो. परंतु माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहचली, असे कोणाला वाटत असेल, त्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझे वक्तव्य मागे घेतो,” असे संजय राऊत म्हणाले.
Balasaheb Thorat, Maharashtra Min & Congress leader on Sanjay Raut's statement 'Indira Gandhi used to meet Karim Lala (underworld don)': His statement was wrong but he has retracted it so matter ends. He should be careful in future. We had made him(Uddhav Thackeray)aware of this. pic.twitter.com/5o9Ka55qB6
— ANI (@ANI) January 16, 2020
संजय राऊतांनी इंदिरा गांधीसदर्भात केलेले विधान हे चुकीचे होते. अशा प्रकारचे विधान पुन्हा होऊ नये, अशी त्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना दिला आहे. आणि आम्ही अशा प्रकारचे विधान पुढच्या काळात सहन करणार नाही, असा दमही थोरातांनी राऊतांना भरला आहे. यासंदर्भातील नाराजी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविली, असल्याचे थोरातांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. महापुरुषांबाबत कोणतेही विधान वाईट विधान आम्ही सहन करणार नाही, असे मत थोरातांनी व्यक्त केले आहे.
राऊत नेमके काय म्हणाले
”एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. आता अंडरवर्ल्ड काहीच राहिलेले नाही. तेव्हाच्या काळातील अडरवर्ल्ड काय होते हो आम्ही पाहिलेले आहे. त्या काळात मुंबईचे अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होते. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खे मंत्रालय खाली येत होते. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. यानंतर राज्याचे राजकारण तापल्यानंतर संजय राऊतांनी आज (१६ जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. यात राऊत म्हणाले की,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.