HW News Marathi
देश / विदेश

‘राज्यपाल भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यसरकारमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करत आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता त्यांचं मौन सोडलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ज्या राज्यात भाजपाची सरकारे नाहीत, तिथे भाजपा राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप राऊतांनी केला आहे.

तिकडं दिल्लीतही हेच चाललंय ?

संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. संसदेत विरोधकांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे. भाजपची सरकारे नसलेल्या राज्यात भाजपा राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहे. तिकडं दिल्लीतही हेच चाललंय ? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालमध्येही राज्यपालांमार्फत हेच काम सुरू आहे. इकडं महाराष्ट्रातही राज्यपाल त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या, काही हरकत नाहीत. दम लागून पडाल, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नये

राज्यसरकाने केलेल्या कामात राज्यपालांनी ढवळाढवळ करू नये असा सल्ला दिला होता. राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाशी आढावा बैठका ठेवल्या होत्या. त्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा आक्षेप घेण्यात आला होता. तसेच राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नयेत, तो सरकारचा अधिकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री नाहीत, राज्यात दोन सत्ताकेंद्रे करू नका असे अवगत करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले होते.

काय म्हणाले नवाब मलिक ?

राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने नांदेड येथील स्वा. रा. तीर्थ विद्यापीठात दोन वसतिगृहे बांधली आहेत. सध्या वसतिगृहे विद्यापीठाकडे सोपवलेली नाहीत. त्यामुळे त्याचे उद्घाटन राज्यपालांनी करू नये, असे आवाहन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र राज्यपालांनी हे आवाहन धुडकावले. सुधारित दौऱ्यातही वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलभूषण जाधव प्रकरणी हस्तक्षेपास युनोचा नकार

News Desk

“शेअर बाजाराचा हिशोब भाजपला द्यावा लागेल”, संजय राऊतांचा इशारा

Aprna

दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवते विरोधात !

News Desk