HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले…

मुंबई। दिवाळीच्या सणातही राजकीय टोलेबाजी सुरूच आहे. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीवरून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तो अपक्ष उमेदवार असल्याचा वक्तव्य केलं होतं. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत दाखवत राणेंची बोलती बंद केली आहे.

शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

‘सबसे अलग हुं..पर गलत नही ! जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत.. त्यांचा हा जळफळाट आहे. जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा’ असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.तर दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. नारायण राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी करून ते भाजपमध्ये गेलेत. उद्या ते भाजपशीही बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जातील, आजपर्यंत नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कुणी केली नसेल. त्यामुळे राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी राणेंना फटकारून काढलं.

नारायण राणे काय म्हणाले होते?

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं संजय राऊतांना भान राहत नाही, संजय राऊतांचे अग्रलेख वाचले. अपक्ष उमेदवार हा दादरा नगर हवेलीत जिंकला. ती आम्ही जिंकली जिंकली असा डंका पिटला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतात. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात, असं नारायण राणेंनी म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

Aprna

उमेदवारांच्या खर्चाची तपासणी प्राप्तिकर आणि विक्रीकर अधिकारी तपासणार

News Desk

महाविकासआघाडी सरकारकडून OBC समाजाची कोंडीच, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Aprna