HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद हा नवा ‘महात्मा’ निर्माण झाला

मुंबई | राज्यात ओढवलेल्या कोरोनाच्या संकटातून लोकांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तसेच, लॉकडाऊनच्या काळात अनेक जागी अडकलेले श्रमिक, मजूर आपापल्या घरी कसे सुखरूप जातील यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न केले गेले. केंद्र सरकारने विशेष रेल्वे सुरू केल्या. तर, राज्य सरकारने देखील गाड्या करून त्यांना आपल्या गावी पोहचवले. अशातच, बॉलिवुडचा कलाकार सोनू सूद याने मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी कधी स्वतःच्या खर्चातून तर कधी ट्रस्टच्या मदतीने पैसे एकवट करत त्यांना घरी पोहचवले. सर्वांनी त्याचे कौतुक केले. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र त्याच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या अग्रलेखातून केली आहे.

तसेच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये बाहेरील लोकांना घ्यायला तयार नसताना सोनू सूद या सर्वांना नक्की कुठे पाठवत होता? लॉकडाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झालीच कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते सर्व मिळत होते. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता मोदींच्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस जातील. एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणूनच सोनू सूद लॉकडाऊनचा मालामाल हिरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉकडाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरुन निघाला, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजगृह’वर झालेल्या तोडफोडीचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर

News Desk

“अजित दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ‘ती’ भाषा शिकणार” – मुख्यमंत्री

News Desk

“शिव पंख” लावून द्या, कामावर तरी जाता येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मनसेची खोचक टीका!

News Desk