HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?” देशमुख प्रकरणावरून राऊतांचा सवाल!

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक सवाल केला आहे. “अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी भाजपावर केली.

एकीकडे अनिल देशमुखांना ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्वव ठाकरेंना पत्र लिहून भाजपाशी पुन्हा युती करण्याची गळ घातली आहे. या दोन मुद्द्यांवरून भाजपाकडून सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर संजय राऊतांनी आज (२९ जून) पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला आहे.

“तिन्ही नेते लवकरच पुढील पावलं टाकतील”

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील, अशी माहिती दिली आहे. “अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्ध समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे आरोप भापपाच्या लोकांवर कधी झाले नाहीत का? तिथे सगळे धुतल्या तांदळाप्रमाणे आहेत का? ते सगळे हरिशचंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का याचा राज्यातल्या ११ कोटी जनतेनं विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील असं दिसतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला सत्तस्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार ?

News Desk

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा अहवाल

Aprna

समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र! – मुख्यमंत्री

Aprna