HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील केंद्रातील मंत्र्यांनी मोदींच्या सहीचा २ हजार कोटींचा चेक घेऊन यावा!

मुंबई | राज्यात आलेलं पूराचं संकट आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकीय नेत्यांचं भांडण. यावर शिवसेननेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. आज (२७ जुलै) पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील केंद्रामधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या राज्यातील जनतेला मदत आणि सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची म्हणून काही जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतं.

विशेषत मुंबई. पण आम्ही तो हिशोब मागायला बसलो नाही. केंद्र आमचा बाप आहे. त्यांच्याकडून मदत झाली तर ती नक्कीच स्विकारली जाईल, असं सांगतानाच केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मंत्री आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचा दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं. आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

केंद्रात आपले एवढे मंत्री आहेत

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. पण केंद्राची स्वत:ची म्हणून जबाबदारी असते. त्यांनी मदत केली पाहिजे. या मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय साधून आहे. मुख्यमंत्री स्वत: केंद्रात बोलत आहेत. काही कमी जास्त झाले तर विरोधी पक्ष आहेत. ते बोलतील. केंद्रात आपले एवढे मंत्री आहेत. तेही बोलतील. ही राजकीय श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्याचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा राजकीय श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही, असं राऊत म्हणाले.

तळीये येथील नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधून देणार आहोत. पण केंद्राकडून कोणती योजना येत असेल तर त्याचा राज्य सरकार विचार करेल, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील मंत्री काही केंद्रात आहेत. त्यांनी काही घोषणा केल्या आहेत. त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा. नरेंद्र मोदींच्या सहीचा चेक मिळाला तर आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू. कोकण, सातारा, सांगलीच्या लोकांना देऊ. कारण एकएक पै महत्त्वाचा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

राजकीय पर्यटन करू नका

मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते, त्यांच्यासोबत काही लोक होते. तेव्हा त्यांना पदावरून जावं लागलं. अशा घटना घडतात तेव्हा तिथे रेस्क्यू ऑपरेशन करताना डिस्टर्ब होतं. राजकीय नेत्यांनी आपल्यावर नियंत्रण ठेवावं. थोडा संयम ठेवावा. राजकीय पर्यटन करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

हीश्रेयवादाची लढाई नाही

देशात अशा घटना घडतात तेव्हा बचाव कार्य सुरू होतं. तेव्हा कोणतेही अडथळे येऊ नये हा एक नियम आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडतात तेव्हा आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, अधिकाऱ्यांवर आरोप करणं, त्यांच्यावर हल्ले करणं हे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येकजण मनात वेदना घेऊन मदत कार्य करत आहे. तेव्हा आरोप प्रत्यारोप कशाला? महाराष्ट्र आपला आहे. कोकण आपला आहे. सातारा, सांगलीची लोकं आपली आहेत. ही काही श्रेयाची लढाई नाही. चढाई लढाई नाही. जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणूसकी शून्य काम करत आहेत. असं होऊ नये, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात पहिली

swarit

“२४ तासात चौकशीसाठी हजर राहा, नाहीतर घरी येऊन चौकशी करू”, देशमुखांना ईडीचं उत्तर

News Desk

चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव संजय राऊत मुंबईतच अडवणार!

News Desk