HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या आजच्या दिल्लीतील बैठकीवर संजय राऊत म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२२ जून) दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचं महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी

आजच्या बैठकीत काही महत्त्वाचं होईल असं वाटत नाही. पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असं म्हणता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

मोदी विरोधी शब्द चुकीचा आहे

मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं योग्य नाही. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष प्रबळ करणं हे गरजेचं आहे. पवार तेच करत आहेत. त्यामुळे मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं चुकीचं आहे, असं सांगतानाच काँग्रेस, शिवसेनेशिवाय देशात तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांतदादांचं दु:ख नक्कीच समजू शकतो

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. शरद पवार आणि शिवसेना सत्तेत एकत्र आहेत हे ते विसरतात. पवार-शिवसेना एकत्र असल्यामुळेच तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात. अर्थात तुमचं हे दु:ख समजू शकतो, असा चिमटा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला. तर, चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत? कोणत्या पक्षात आहेत हे मला माहीत नाही. ते भाजपचे आहेत का हे मला माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी २ मुख्यमंत्र्याच्या गावी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपचं खिंडार

News Desk

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk

पु. ल. देशपांडे यांना गुगलची मानवंदना, जयंतीनिमित्त बनवलं खास डूडल

News Desk