HW News Marathi
महाराष्ट्र

पु. ल. देशपांडे यांना गुगलची मानवंदना, जयंतीनिमित्त बनवलं खास डूडल

मुंबई | मराठी साहित्य क्षेत्र ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं नाव म्हणजे पु.ल. देशपांडे. साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची दखल गूगलने घेतली आहे. पुलंच्या 101व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल बनवलं आहे. ‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात पु ल देशपांडे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल अशा नावाने जनमाणसात पोहोच असलेलं एक भन्नाट व्यक्तिमत्व. लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा कित्येक भूमिका त्यांनी बजावल्या. हजरजबाबीपणा ही त्यांची खास ओळख. त्यातून आलेले अनेक किस्से आजही चर्चेत असतात. पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत.

पुलंच्या जीवन आणि कार्याची संपूर्ण माहिती या डूडलच्या निमित्ताने मिळत आहे. गुगलने साकारलेल्या या डूडलमध्ये पुलं हे हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मागे विविध रंगांची उधळणही केल्याचं दिसत आहे.पुलंचे व्यक्तीमत्त्व उलगडणाऱ्या या ऑनलाईन प्रदर्शनासाठी आशुतोष आणि दिनेश ठाकूर यांनी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

गुगलने केलेल्या दालनामध्ये पुलंच्या बहुआयामी योगदानाचा वेध घेण्यात आला आहे. यात दुर्मिळ छायाचित्रे, ऑडिओ टेपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पुलंचा जन्म आणि त्यांचे आयुष्य, लेखन, चित्रपट, नाटकांची पोस्टर्सही यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या कारवाईनंतर सरकारला कोणताही धोका नाही, गृहमंत्र्यांचा विश्वास

Aprna

राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिला प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

Aprna

“कोरोना ही बिल गेट्सची कल्पना” बंडातात्या कराडकरांचे अजब वक्तव्य

News Desk